[333+] Birthday Wishes in Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

तुम्ही देखील Birthday Wishes in Marathi शोधत आहात का, जर होय तर तुम्ही योग्य लेखात आला आहात आम्ही Heart Touching, Love, Husband, Sister, Best Friend आणि Brother साठी वाढदिवसाच्या खास शुभेच्छांचा संग्रह आणला आहे, जो तुम्ही खाली पाहू शकता.

वाढदिवस म्हणजे एक खास दिवस, ज्यादिवशी आपण आपल्या प्रिय व्यक्तींना त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या क्षणांचे महत्त्व दर्शवू शकतो. हा दिवस त्यांच्या जीवनात आनंद आणि प्रेम भरून टाकण्यासाठी एक खास संधी असतो. मराठीमध्ये दिलेल्या हृदयस्पर्शी शुभेच्छा त्या दिवसाचे खासत्व वाढवतात आणि त्यांच्या मनामध्ये एक अमूल्य स्थान निर्माण करतात.

आपल्या पतीसाठी, बहिणीसाठी, मित्रासाठी आणि भावासाठी दिलेल्या शुभेच्छा त्यांचे प्रेम आणि काळजी व्यक्त करतात. पतीसाठी दिलेल्या शुभेच्छांमध्ये त्यांच्या सहवासाने जीवन किती सुंदर बनले हे व्यक्त केले जाते. बहिणीसाठी दिलेल्या शुभेच्छांमध्ये तिच्या सहकार्याचे आणि प्रेमाचे मनःपूर्वक आभार मानले जातात. मित्रांसाठी शुभेच्छा त्यांच्या जीवनातील अनमोल साथीपणाचे कौतुक करतात, आणि भावासाठी शुभेच्छा त्यांच्या विश्वासार्हतेची आणि समर्थनाची प्रशंसा करतात.

या विशेष दिवसासाठी दिलेल्या हृदयस्पर्शी शुभेच्छा, त्या प्रिय व्यक्तीला आनंद, प्रेम आणि सुखाच्या अनुभवांची गोडी देतात, त्यांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण करतात.

Happy Birthday Wishes in Marathi

वर्षाचे 365 दिवस ..
महिन्याचे 30 दिवस ..
आठवड्याचे 7 दिवस..
आणि माझा आवडता दिवस,
तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा…!

तुझ्या केवळ असण्यानेच आमचं आयुष्य आनंदी आहे,
तू नेहमी निरोगी आणि सुखी राहा हिच देवाजवळ प्रार्थना…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
आयुष्याच्या या पायरीवर..
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…!

नाते आपल्या प्रेमाचे
दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू
माझ्या शुभेच्छांच्या
पावसात भिजावे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मनाला अवीट आनंद देणारा,
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की,
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे….
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…!!!

छोट्या छोट्या गोष्टींसाठी जे कपल भांडतात,
तेच खरे एकमेकांवर प्रेम करतात,
बायको तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

आयुष्यात तुम्हाला सुख,
समाधान, समृद्धी मिळो आणि
दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
बाबा, वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!

पऱ्यांसारखी सुंदर आहेस तू
तुला मिळवून मी झालो धन्य
प्रत्येक जन्मी तूच मला मिळोवी
हीच आहे माझी एकमेव इच्छा तुझ्या वाढदिवशी

हास्य तुझ्या चेहऱ्यावरून कुठेच जाऊ नये,
अश्रू तुझ्या डोळ्यात कधीच येऊ नये,
पूर्ण होवो तुझ्या सर्व इच्छा हिच परमेश्वर चरणी प्रार्थना…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

नशिबवान असतात ते लोक ज्यांच्या डोक्यावर
वडिलांचा हात असतो आणि
माझ्याइतकं नशिबवान कोणीच नाही
कारण तुम्ही माझे बाबा आहात,
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा बाबा!

नातं आपल्या मैत्रीचे
दिवसेंदिवस असंच फ़ुलत राहावे,
तुझ्या या वाढदिवसादिवशी,
तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे…!!!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

माझ्या आयुष्यातील माझी
सगळ्यात लाडकी व्यक्ती
म्हणजे तुम्ही,
तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी
किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी
वाढ दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना.

तुमचा चेहरा जेव्हा समोर आला,
तेव्हा माझं मन फुललं,
देवाची आभारी आहे ज्याने,
तुमची माझी भेट घडवली.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!

खिसा रिकामा असूनही कधी दिला नाही नकार,
तुमच्याइतका श्रीमंत व्यक्ती आजपर्यंत कधीच आला नाही आयुष्यात,
अशा माझ्या बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

पऱ्यांसारखी सुंदर आहेस तू,
तुला मिळवून मी झालो धन्य,
प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी,
हीच आहे माझी एकमेव इच्छा तुझ्या वाढदिवशी…!!!

तुमच्या मनाच्या ठायी असलेला मोठेपणा
मला जीवनाचे रहस्य सांगतात,
तुम्ही मला कायम विठ्ठलासारखे भासता,
प्रिय बाबा वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!

माझ्या स्वप्नांसाठी तुम्ही तुमचे आयुष्य पणाला लावले,
अजून काय हवे,
यापुढे तुम्हाला सर्व सुख मिळो हीच सदिच्छा,
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Heart Touching Birthday Wishes in Marathi

तुझा हा दिवस आनंद
आणि उत्साहाने परिपूर्ण होवो.
माझ्या प्रिय मित्रा मी
तुझ्यासाठी उत्कृष्ट आणि
शानदार वाढदिवसाची प्रार्थना करतो.
हॅपी बर्थडे.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,
तुमचं वाढदिवस खास असो आणि तुमचं संपूर्ण वर्ष सुंदर,
समृद्ध आणि आनंदानंदित जाऊया.

आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो….
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो.
माझ्या प्रिय पतींना वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा.

मी किती ही मोठा झालो,
तरीही असे वाटते की आपण
कालच तरुण होतो.
वाढदिवसाच्या माझ्या
प्रिय मित्राला भरपूर शुभेच्छा.

परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की
तुझे येणारे वर्ष व
पुढील संपूर्ण आयुष्य
प्रेम आणि आनंदाने भरलेले असो.
उदंड आयुष्याचा अनंत शुभेच्छा आई.

आज तुमचं वाढदिवस, आज तुमचं सण,
आज तुमचं खूपच खूप धन्यवाद दिवस

माझे आयुष्य, माझा सोबती
माझा श्वास, माझे स्वप्न
माझे प्रेम आणि माझा प्राण
सर्वकाही तुम्हीच…
तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

सगळ्यांनी देतंय शुभेच्छा,
तुम्ही या शुभेच्छा एकट्याने साकार करा.

कधी भांडते, तर कधी रूसते
परंतु न सांगता माझ्या मनातील ओळखते
खरोखर अशी बहीण नशीबवान लोकांनाच मिळते
माझ्या दिदी ला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

आज तुमचं वाढदिवस, आज तुमचं सण!
तुम्हाला खूपच खूप शुभेच्छा!

रक्ताने जरी आम्ही बहिणी असलो
तरी मनाने फक्त आणि फक्त
एकमेकांच्या प्रिय मैत्रिणी आहोत.

मी श्वास घेण्याचे कारण आहेस तू
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू
माझ पहिल आणि शेवटच प्रेम आहेस तू
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Love Birthday Wishes in Marathi

मी खूप नशीबवान आहे
कारण मला तुझ्यासारखी मनमिळावू,
समजूतदार, काळजी घेणारी,
जिवापाड प्रेम करणारी जोडीदारीण मिळाली
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तुला पाहताना नव्याने पुन्हा मी तुझ्या प्रेमात पडते…
तुझ्यावर मला असंच आयुष्यभर प्रेम करायचं आहे.
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

वाद झाला तरी चालेल
पण नाद झालाच पाहिजे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नाते आपले प्रेमाचे,
आनंदाचे आणि सौख्याचे…
असेच बहरत राहू दे…
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

ह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी
तुझी सर्व स्वप्ने साकार व्हावी,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
मला फक्त तुझी साथ मिळावी.
माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

वाइनची बाटली आहेस
तू वयाचा नाही पडत!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुझ्याशिवाय माझ्या
जगण्याला काहीच अर्थ नाही.
प्रिये तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

माय लव्ह,
आजचा दिवस माझ्यासाठी आहे खूपच खास…
परमेश्वर तुला उदंड आयुष्य देवो हाच आहे
माझा मनापासून ध्यास…
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा…

संकल्प असावे तुझे नवे, मिळावी त्यांना योग्य दिशा…
तुझ्यासोबत प्रत्येक क्षण जगणे हीच आहे माझी आशा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कव्हर…
वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय तुझा लव्हर!

जास्त इंग्लिश नाही येत,
नाहीतर दोन पानांचं स्टेटस ठेवले असते,
पण आता मराठीमध्ये वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,

प्रेमाचे नाते आपले आयुष्यभर जपून ठेव,
तुझ्यासोबत वाढदिवस साजरा करायचा आहे.
माझ्यासाठी खास वेळ ठेव…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

संकल्प असावे तुझे नवे,
मिळावी त्यांना योग्य दिशा…
तुझ्यासोबत प्रत्येक क्षण जगणे
हीच आहे माझी आशा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही.
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्यासारखा कोणी नाही.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा स्वीट हार्ट…

आज काल स्वप्नानाहीत तुझी संगत झाली आहे
तुझ्यामुळे माझ्या जगण्याला रंगत आली आहे.
हॅपी बर्थडे डियर…

खूप दिवसापूर्वी खूप दूर असलेल्या
आकाश गंगेमध्ये एका धूमकेतूने जन्म घेतला होता
त्या धूमकेतूला वाढदिवसाच्या
ब्लॅक होल भरून शुभेच्छा

Husband Birthday Wishes in Marathi

जेथे प्रेम आहे, तिथे जीवन आहे,
माझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

परिपूर्ण संसार म्हणजे काय?
हे ज्याने मला दाखवून दिले,
अशा माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

तुम्ही सर्वोत्तम पती आणि सर्वोत्तम मित्र आहात!
तुम्ही नेहमीच प्रेमळ आणि नेहमीच माझे आहात.
हॅपी बर्थडे पती.

परमेश्वराचे लाख लाख धन्यवाद
ज्याने मला जगातील सगळ्यात सुंदर
प्रेमळ आणि समुजतदार व्यक्तीची भेट घडवून दिली,
माझ्या पतीदेवांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

चांगल्या वाईट वेळेत सदैव माझ्यासोबत
असलेल्या माझ्या प्रिय पतीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

आकाशापासून ते महासागरापर्यंत
निखळ प्रेमापासून ते सखोल विश्वासापर्यंत
तुम्ही आयुष्यभर सोबत राहा,
माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

तुझ्या प्रेमाचा बहर असाच येऊ दे,
त्या प्रेमात मी वाहून जाऊ दे,
प्रिय नवऱ्या तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

आयुष्यात केवळ असावा तुमच्यासारखा जोडीदार,
ज्याच्या असण्याने मिळावे जीवनाला आधार,
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रत्येकाला तुमच्यासारखा चांगला जोडीदार मिळाला,
तर आयुष्य किती सुंदर होईल,
आहे मी खूप भाग्यवान,
नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

कधी भांडतो, कधी रुसतो,
पण नेहमी एकमेकांचा
आदर करतो,
असेच भांडत राहू,
पण कायम सोबत राहू,
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

शिंपल्याचे शो पीस नको,
जीव अडकला मोत्यात,
टिक टिक वाजते डोक्यात,
माझ्या प्रेमळ पतीदेवला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

प्रेम आणि काळजी घेत
तुम्ही माझे आयुष्य केले आहे खूपच सुंदर
नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

माझं आयुष्य माझा सोबती
तू दिलीस माझ्या आयुष्याला नवी दिशा,
प्रिय नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

आयुष्याने तुमच्या रुपाने दिले मला एक बेस्ट गिफ्ट,
आयुष्यात अजून काही नको मला आता ,
फक्त हवी तुमची साथ
नवरोबा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

परिपूर्ण संसार म्हणजे काय?
हे आपण मला दाखवून दिले आहे.
विश्वातील सर्वोत्तम, सर्वात समजूतदार आणि प्रेमळ
पतीसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Sister Birthday Wishes in Marathi

आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो आणि तुझी माझी साथ जन्मोजन्मी राहो…
लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

काळजी रुपी तिचा धाक
अन् प्रेमळ तिची साथ
ममतेने मन ओलेचिंब
जणू पाण्यात दिसती माझेच प्रतिबिंब
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई

आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही.
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्यासारखा कोणी नाही.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ताई

सर्व जगाहून वेगळी आहे माझी बहीण
सर्व जगात मला प्रिय आहे माझी बहीण
फक्त आंनदच सर्वकाही नसतो
मला माझ्या आंनदाहूनही प्रिय आहे माझी बहीण..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दीदी

हे जग खूपच सुंदर वाटतं जेव्हा तु माझ्या सोबत असतेस…
माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्याशी नेहमी भांडणाऱ्या,
परंतु वेळप्रसंगी तितक्याच प्रेमाने आणि
खंबीरपणे मला साथ देणाऱ्या माझ्या प्रिय
बहिणीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

तू फक्त माझी बहीणच नाही तर एक सुंदर व्यक्ती आणि विश्वासू मैत्रीण आहेस…
तुझ्यासोबत माझा प्रत्येक क्षण नेहमीच खास असतो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

दिवस आहे खास,
माझ्या बहिणीचा वाढदिवस आज..
वाढदिवसाच्या खूप मनापासून शुभेच्छा

कधी भांडते तर कधी रूसते
परंतु न सांगता माझ्या मनातील ओळखते
खरोखर अशी बहीण नशीबवान लोकांनाच मिळते
माझ्या दिदी ला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

आज तुझा वाढदिवस लाख लाख शुभेच्छा…
जे जे हवं ते सारं काही मिळो तुला.
ताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तुझ्या चेहऱ्यावर सतत आनंद असावा,
तुझं जीवनात सुखाचा वर्षाव व्हावा,
तु इतकी मोठी आणि किर्तीवान व्हावीस
की मी साऱ्या जगाला तुझा अभिमान वाटावा.
माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मी खूप भाग्यवान आहे कारण मला तुझ्यासारखी बहीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी आणि आईप्रमाणेच माझ्यावर प्रेम करणारी…
ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या गोड काळजीवाहू,
वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या प्रेमळ
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

अभिमान आहे मला तुझी धाकटी बहीण
असल्याचा ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

सर्वात वेगळी आहे माझी बहीण,
सर्वात प्रेमळ आहे माझी बहीण,
माझ्यासाठी तर माझं सर्वस्व आहे माझी बहीण.
वाढदिवसाच्या शुभेच्छा

Leave a Comment